Monday, October 25, 2010

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे

सिनेमास्रुष्टीतिल मैलाचे दगड: सिनेमास्रुष्टीतिल मैलाचे दगड: "काल परवा दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे ने १५ वर्ष पुर्ण केल्याचि बातमि वाचलि.पटकन शाळा बुडवुन पाहिलेला हा सिनेमा आठवला. सिनेमा आवडला,पुन्ह..."

सिनेमास्रुष्टीतिल मैलाचे दगड


काल परवा दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे ने १५ वर्ष पुर्ण केल्याचि बातमि वाचलि.पटकन शाळा बुडवुन पाहिलेला हा सिनेमा आठवला.

सिनेमा आवडला,पुन्हा पाहिला,पुन्हा आवडला मग पुन्हा पुन्हा पाहिला.

काल लागलेला चित्रपट आज उतरावा लागण्याच्या जमान्यात भारतिय प्रेक्षक गेलि १५ वर्ष हा सिनेमा पहात आहेत.


त्याकाळात नाविन्यपुर्ण असलेलि हि कथा आजहि तितकिच आकर्षक वाटते.

राज आणि सिमरन चि हि कथा.सिमरन परदेशात वाढलेलि परंतु मना
ने भारतिय नारि.

तर राज हा वाया गेलेल्या तरुणांच प्रतिनिधित्व करणारा.

परिस्थितिमुळे अत्यंत भिन्न मनोव्रुत्तिचि हि माणसं एकमेकांच्या सहवासात येतात ,

आणि तिरस्काराच रुपांतर प्रेमात कधि घडत हे दोघांनाहि कळत नाहि.

सिमरनचि भुमिका काजोल अक्षरश: जगलिय अस म्हणायला हरकत नाहि.

जगाच्या पाठीवर कुठेहि गेलेतरि भारतिय स्त्रिच्या मानेवर असनार जु तिने न बोलताच डोळ्यांद्वारे व्यक्त केलय.

मला वाटत बहुंताश भारतिय महिलांच प्रतिनिधित्व हि सिमरन करते.

आधुनिकता आणि परंपरा यांच्या चौकटित ति तोल सांभाळते आहे.

स्वच्छंद आयुष्य जगण्याचि कांक्षा तिच्यात आहे पण कुटुंबाप्रति असलेल्या जबाबदारिचहि भान तिला आहे.


त्यामुळे आहे त्याच आयुष्यात जमेल तितकि मजा करुन घेण्याचा प्रयत्न ति करते.

राजच तिच्या आयुष्यात येण हा अपघात आणि त्यापुढे त्या दोघांत फ़ुललेल प्रेम हा त्याहुन मोठा योगायोग.

आपल्याला प्रेम झालय हे मनात कबुल करायलाहि घाबरणारि सिमरन वेळ येताच प्रेमाखातर धाडसिहि बनते.

कधि हळवि,कधि घाबरलेलि,कधि मुग्ध,कधि धाडसि अशा विविध छटा असलेलि भुमिका करायला मिळण हे काजोलच भाग्यच.

शाहरुखचा सिनेमा थियेटरमधे पहाण्याचि वेळ दोन चित्रपटांच्या वेळेसच आलि आलि.

"DDLJ आणि कभि हां कभि ना."त्याचे हे दोन चित्रपटच मला आवडले.

नाहितर हा नट खुप overacting करतो अस माझ ठाम मत आहे
.आणि ते तसेच राहिल याचि काळजि तो प्रत्येक चित्रपटात घेतो.

DDLJमधे साकारलेला राज हा छानच.मुळात हि भुमिका किंवा हे पात्र जवळपास प्रत्येक भारतिय तरुणाच प्रतिनिधित्व करते.

"किसिके गाल" तो "किसिके बाल"अच्छे है अशा मनोव्रुत्तिचा आणि प्र
त्येक सिनोरिटाच्या प्रेमात(?) पडणारा राज विवाहासाठि मात्र सोज्वळ सिमरनलाच निवडतो.

आजहि माझ्यासहित कित्येक जणांना बाहेर बिर्याणि हवि असलि तरि घरि वरण भातच हवा या व्रुत्तिच पडद्यावरिल रुप म्हणजे राज.


आयुष्याला आणि प्रत्येक गोष्टिला बेफ़िकिरपणे घेणारा राज जिव ला
वण्याऱ्या सिमरनसाठि हमालिहि करतो.

वडिलांच्या व्यवसाय धंद्यापासुन दुर पळायला बघणरा राज ठामपणाने सिमरनचा हात पकडुन तिचि जबाबदारिहि स्विकारतो.



इतर कलाकारांच्या भुमिकाहि तितक्याच महत्वाच्या.

पारंपारिक अमरिश पुरि,दिलखुलास अनुपम खेर,फ़रिदा जलालचि संयमित आई.हे लोक म्हणजे सोने पे सुहागा.

आदित्यचि एकदम सशक्त कथा पटकथा ,माझ्या आवडत्या संगितकार द्वयिच (जतिन-ललित) आजहि लोकप्रिय आणि कर्णमधुर संगित.


आदित्य चोप्राचा हा पहिलाच चित्रपट आणि मला वाटत इतका चांगला एकमेव चित्रपट.


त्यानंतर याच टिमचे इतर चित्रपट आले पण घडला नाहि.मला वाटत चित्रपट बनवता येत नाहि तो घडतो.


आता इतक सगळ असल्यावर भारतिय प्रेक्षकाला अजुन काय पाहिजे.हा चित्रपट १५ वर्ष चालनारच.

खंत फ़क्त एकाच गोष्टिचि आहे,या सिमरनला तिचा राज भेटला पण प्रत्येक सिमरनला तो भेटतोच अस नाहि.

१५ वर्षापुर्विहि भारतिय तरुणिला आपल्या मनतिल व्यथा हि सिमरन पडद्यावर दाखवतेय अस वाटत होत आणि आजहि बहुतांश ठिकाणी तेच वाटतय.

आजच्या सिमरनच मतहि लग्नाच्या वेळि घेतल जाउ लागलय पण हे प्रमाण शहरि भागातहि कमि आहे तर खेड्यांबाबतित न बोललेलच बर.

चला ठिक आहे आपण आशावादि राहुयात.

"बडे बडे देशोंमे ऐसि छोटि छोटि बातें होतिं रहति है."

सध्यातरी प्रत्येक सिमरनला राज भेटो वा न भेटो परंतु एका स्वच्छंदि फ़ुलपाखराप्रमाणे तिच आयुष्य तिला जगायला मिळो हिच शुभेच्छा !!!!!!!!!!